Nat Geo Wild

I relish in giving you, friends, pleasure of every variety from my posts.

Here is another variety.

देव तारी त्याला कोण मारी ह्याच्या पुष्ट्यर्थ “Nat Geo Wild” ह्या channel वर प्रत्यक्ष चित्रीकरण केलेला एक प्रसंग पाहून माझ्या अंगावर प्रथम कांटा आला आणि नंतर सुटकेचा निश्वास सोडत मी आनंदी पण झालो…

बायसन ह्या अजस्त्र गो-कुटुंबाच्या एका आई-बाळाची आहे ही गोष्ट… बाळ जन्मून काही तासच झालेले आहेत…

जंगलात हिंडतांना मोठमोठ्या नद्या पार कराव्या लागतात..प्रवाहही वेगाने असतो..

ही आई शिरते पाण्यात.. आईच्या मागे बाळ पण शिरते पाण्यात…त्याने कुठे पाणी पाहिले-अनुभवलेले असते…पण जरा पुढे गेल्यावर प्रवाहाचा वेग काही त्याला सांभाळता येत नाही …अगदी आईच्या डोळ्यादेखत बाळ वहात वहात दूर जाऊ लागते…

२-४ मैल असे गेल्यावर ते एके ठिकाणी किना-यावर फेकले जाते. सुदैवाने तो किनारा पैल तीर असतो जिथे आई आधीच गेली होती..

बाळ शुद्धीवर येते..धडपडून उभे रहाते..”आई कुठे माझी…?” असा हंबरडा फोडते..

रात्र होते..चंद्र प्रकाशात लांडगे मागावर असतातच खाद्यासाठी..

येतो एक लांडगा आणि आता काही बाळाची धडगत नाही असे चिन्ह दिसते.

इतक्यात एक बगळा ओरडून आक्रोश करू लागतो…

इकडे आईला बाळाचा वास आलेला असतो..ती
धावत धावत येते..

आणि

अशक्य ते घडते ..लांडगा माघार घेत पळून जातो…आई-बाळ पुनश्च एकत्र येतात..

हे पाहाल तर हृदयाचा एक ठोका चुकलेला अनुभवाल…

मधुसूदन थत्ते
१४-०३-२०१६

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *