Surat Piya Ki..

Surat Piya Ki

मित्रांनो,

दृष्टी आणि कान तृप्त व्हावे असा हा अद्वितीय व्हिडिओ आज ऐकला-पाहिला..

समोर सौंदर्यवती मधुबाला आणि कानी अशा गायकाचे स्वर ज्याला शारदेने सांगितले..”घे हे बारा स्वर आणि बावीस श्रुती आणि मार गान-भरारी…”

अक्षरश: याहून अधिक चांगले रसग्रहण मी काही करू शकलो नाही..

सुरुवातीलाच त्या महान गायकाच्या सुरांची म्हणजे, उस्ताद बडे गुलाम अलींची, पूरिया धनाश्रीतली एक झलक आपण ऐकतो आणि नंतर अशा काही सुरांच्या लहरी एकामागून एक वसंतराव आपल्याला अनुभवायला देतात की काही विचारू नका..

पूरिया धनाश्री, मारवा, मालकंस, आसावरी…मधेच गझल चे स्मरण…
तृप्ती ही काय चीज असते पहा..

आणि ताल..?

त्रिताल, एकताल, रूपक (की झप ताल?)

अशा दैवीी माहौल मध्ये सात मिनिटे चिंब व्हा..

पहा आणि ऐका..

मधुसूदन थत्ते
२०-०३-२०१६

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *