ह्याला काय म्हणावे…सार्थ आत्मविश्वास की वृथा गर्व ..???

फेसबुकचा परिचय आणि virtual ओळख बरीच झालेल्या चाळीशीतल्या एका सुविद्य आणि टोकाचा आत्मविश्वास असलेल्या भगिनीला मी एकदा विचारले…

“काय ग, कुठची एखादी कल्पना (म्हणजे concept ), किंवा देव अथवा अति-मानवी शक्ती किंवा गुरु किंवा निसर्गाचे सुंदर असे अविष्कार…. अशापुढे तू कधी संपूर्ण शरणागती… ज्याला आपण…total surrender …म्हणू हवे तर…मानली आहेस का?…?”

“No …never” ती उत्तरली. आणि पुढे म्हणाली “पण तरीही तुम्ही जरा तुमच्या प्रश्नाचा रोख सांगाल का?”

आता हे बघ, आपल्या वेद-वाङ्ग्मयात चार युगांची संकल्पना आहे, सप्त-स्वर्ग आणि सप्त पाताळ अशा संकल्पना आहेत, उत्पत्ती, स्थिती, लय अशा अवस्था मानल्या आहेत हे सर्व अध्याहृत धरणे ही एक प्रकारची संकल्पनाना शरणागती होऊ शकते. .मी

“मुळीच नाही. मी ह्या गोष्टी अजिबात मानीत नाही”..ती.

“बरं. मग देव अथवा एखादी अति-मानवी शक्ती तुला नमवू शकेल का”..मी जरा जोरच धरला.

“Again, तुम्ही हे लक्षात घ्या की माणसाहून अधिक श्रेष्ठ असे काही असेल तर ते अजून सिद्ध झालेले नाही. सा-या गोष्टी शास्त्राने उलगडून दाखवता येतात…काही अजून उलगडल्या नसल्या तरी एक दिवस त्याही सांगितल्या जातील”..ती तो-यात म्हणाली.

“बरं, मग निसर्गाचा एखादा अविष्कार…सुंदर असा सूर्योदय. द-याखो-यातले धबधबे किंवा निसर्गाचा कोप सुद्धा, जसे त्सुनामी…”…मी

“काका, तुम्ही पुन: तेच पालुपद उगाळताय…अहो ह्यात शरणागती ती कसली…ह्या सगळ्यामागे शास्त्र आहे आणि माणसाने ते जाणले आहे…हा सारा E आणि M चा खेळ आहे”

माझ्या ध्यानात आले तिला Einstein चे समीकरण म्हणायचे होते…E =MC*C

तिने ठामपणे सांगितले…”I believe in myself “…

मी विषय बदलला …कारण तिचे हे मनस्वी विचार म्हणजे

स्वत:वर गर्व होता ?

सार्थ अभिमान होता ?

की अज्ञानात आनंद होता?

मला उत्तर मिळाले नाही.

मधुसूदन थत्ते
27-10-2015

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *