साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी…

Simple Living and High Thinking….साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी…

किती सोपा आहे हा विचार….पण किती कठीण !!!..किती बदल करावे लागतात असे असायला…!!!

आपण म्हणून जातो..”किती साधे आहेत भाऊ …!!!”

त्या remark मागे भाउंचा नुसता वेष किंवा आवेश नसून उच्च विचारसरणीची साधना असते…भाऊ जसे मोठ्या विद्वानांना आपले वाटतात तसेच सामान्यातल्या सामान्यांनाही जवळ करतात…जवळ बसवतात…ह्यात सारे मोल आहे.

भौतिक गरजा कमी कमी करत जाणे हे तर महत्वाचे आहेच पण लोहाचे सुवर्ण करण्यास लागणारी परिसाची पात्रता येण्यासाठी आध्यात्मिक विचारांची मनात बैठक जमवायला हवी,…त्याचा प्रयत्नपूर्वक अभ्यास हवा…आणि तो ही “मी” ला विसरून व्हायला हवा…

मी जेव्हा ह्याचा विचार केला तेव्हा लक्षात आले की भौतिक गरजा तर आपण वाढवत चाललो आहोत…अध्यात्म केवळ स्वार्थासाठी करत आहोत…आपण परीस होण्याऐवजी दिन प्रति दिन लोहाकडे परतत आहोत…”Water finds its own level” ह्या न्यायाने लोहाची दिशा घेतलेल्यांनाच जवळ करतो आहोत…त्यातही “north repels north and south repels south” ह्या चुंबकीय न्यायाने अनेकांना दूर ढकलत आहोत…

कळल पण वळायचं कसं..? साध्या मुळा-मुठा किनारी जाणं होत नाही तो मी एकदम नर्मदा परिक्रमा कसं करणार..?

काही उदाहरणे पाहिली…वाचली…आणि लक्षात आले की उडी घेतली की जमतेच जमते

…अगदी नर्मदा परिक्रमा सुद्धा जमते….

विचार केला……
.
“साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी” अशीच एक “नर्मदा परिक्रमा” आहे हे मानून पाउल पुढे टाकावे.

मधुसूदन थत्ते
१४४-१२-२०१४

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *