श्रद्धा

मित्र म्हणला..

“एक काळजी सांगतो तुला…उपाय सांग…”

“बोल” …मी..

“सांगायला खूप सोपे…रोज रात्री मला वाईट वाईट स्वप्ने पडतात…मी दचकून जागा होतो..एक पुरोहित भेटले ..ते म्हणाले ही कोणाची तरी करणी आहे…अजून काही दिवस होत राहील…!!!”

मी उत्तर दिले…

माझ्या श्रद्धेचेच ते उत्तर…म्हटले पटले तर घे नाहीतर सोडून दे…

हे होते माझे उत्तर…

◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘

“विश्वात खूप काही चांगले आहे आणि चांगले घडून येते ह्यावर श्रद्धा हवी…

एक सुरेख संदेश देणारे “कुंकू” ह्या खूप जुन्या चित्रपटातले गाणे आहे…

“मन शुद्ध तुझे गोष्ट आहे पृथिवी मोलाची….”

मनाचे दोन स्तर असतात…एक आपण म्हणत असतो ते बहिर्मन आणि दुसरे अंतर्मन..
ह्या अंतर्मनावर काही गोष्टी नकळत बहिर्मन कोरून ठेवत असते आणि स्वप्नात फक्त अंतर्मन जागे असते. त्या “कोरलेल्या” गोष्टी मग स्वप्नात आपण बघत असतो.

तू जागेपणी कधीतरी काही कृती किंवा विचार असे केले असण्याची शक्यता आहे ज्यायोगे negative ऊर्जा प्रभावित होऊन सभोवार पसरली गेली असावी…आणि त्यामुळे तुझ्या भोवती एक negative aura तयार झाला असावा..

हा negative aura अगदी सहजपणे इतर कोणाच्या negative aura चे किरण सहज स्वीकारतात आणि त्या इतर कोणी जे विचार प्रसारित केले असतील त्यानुसार तुझ्या अंतर्मनावर ते विचार सहज कोरले जातात. परिणामी वाईट स्वप्ने पडतात..

ह्यावर उपाय?

प्रथम श्रद्धा हवी….नंतर सातत्याने सकारात्मक विचार बहिर्मनात आणण्याचा प्रयत्न हवा…सर्वांचे भले चितणे सहजी व्हायला हवे…

काय होईल ह्याने? एक म्हणजे अंतर्मनावर सकारात्मक विचारांचा लेप निर्माण होईल आणि..

तुझ्या भोवती एक positive aura चे संरक्षण कवच निर्माण होईल जे बाहेरून येणा-या negative aura चे किरण परतून लावू शकेल…

These re my thoughts… पटले तर घे नाही तर सोडून दे

मधुसूदन थत्ते
०६-११-२०१५

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *