वा-याची झुळूक

मी..? मी तर वा-याची झुळूक …काय काय करावे मी…?
◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘

कधी बाजारी, नदीकाठी, राईत किंवा एखाद्या पडक्या वाड्यात कानोसा घेत घेत अशी रमत गमत मी जावे…

कधी कोण्या कळीला स्पर्शून जावे…ती फुलली की पसार होताना हळूच तिचा सुगंध घेऊन इथे तिथे पसरवावा..

एखादी गाण्याची लकेर अंगी घ्यावी किंवा कोण्या झ-याची झुळ झुळ उचलावी…

किंवा पाचूच्या शेतावर हळूच हात फिरवावा किंवा शांत नदीच्या जळावर मखमली असे तरंग उमटवीत जावे..

वेळूच्या वनी वेणू वाजवून पहावी किंवा कणसांना काही हितगुज सांगावे…

बकुळीला हलवून सडा घालावा किंवा अलगद अशी जांभळे भुईवर पाडावी…

दिवसभर श्रमून दमल्या पान्थस्थाच्या मुखावर टवटवी आणावी

आणि अशा स्वच्छंद मौजा करत करत तिन्हीसांजेला मात्र मी विसावा घ्यावा…!!!

मित्रांनो, सुप्रभात.

हा कल्पनाविलास माझा नाही तर कवी दामोदर अच्युत खरे ह्यांनी एका कवितेत केलेला तुम्हाला देत आहे…

संदर्भ.: आठवणीतल्या कविता भाग (४) पृष्ठ ७४.

शब्दांकन..:..मधुसूदन थत्ते
०५-०३-२०१६

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *