मी आणि माझ्या मनातली जुनी (जुनाट?) गाणी

“अभी तो मै जवान हूं…अभी तो मै जवान हूं…”

लताचं हे अद्वितीय गाणं DVD वर लागलं आणि डोळे मिटून क्षणार्धांत मी मनाने १९५४ च्या अमीन सयानीच्या राज्यात आलो…रेडिओ सिलोन…”भाइयो और बहेनो..”अमीन सयानी निवेदन करत होता. आता बहुतेक अनारकलीमधलं “मुहोब्बत ऐसी धडकन है..” लागणार…

इतक्यात खांद्यावर चापटी पडून मन पुनश्च २०१२ च्या माझ्या घरात आलो.

मोठी बहीण म्हणत होती “काय तीच ती जुनाट गाणी ऐकत बसतोस?”

त्या बिचारीला काय कल्पना की मी नुसतं जुनं गाणं ऐकत नव्हतो तर वयाच्या त्या तेराव्या वर्षीच्या आठवणीत डुंबणार होतो.

आणखी एक…..त्यातल्या अनेक गीतात मला माझी त्या काळाची जुनी मुंबई आणि रस्ते दिसतात…जिथे मी मनसोक्त हिंडली-वावरलो आहे….

तेव्हां फक्त रेडिओ असायचे. त्यांत सिलोन मोठ्या मुष्किलीनं लागायचं. दर रविवारची “हमेशा जवां” गीतं रात्री दहाला लागायची. ही सारी त्या काळची गाणी म्हणजे माझी Time Machines होती. त्यावर स्वार होऊन मी चाळीस-पन्नास वर्षेमागे जात असे, रम्य स्मृतींना उजाळा मिळत असे. इतरांना ही तीच ती जुनाट गाणी असतील पण मला ते एक भूत काळात डोकावायला सुलभ साधन होते.

बसंत बहार picture मधलं भीमसेनजी-मन्ना डे यांचं “केतकी गुलाब फूल हे बसंत बहार रागांतलं गाणं मनांत बहार आणायचं आणि भरत भूषण ची ती वरचा षड्ज लाऊन केलेली entry तर लाजवाब होती. तो माझा शाळेतला काळ. तेंव्हा घेतलेले को-या पुस्तकांचे वास आजही मला ही गाणी ऐकतांना तसेच येतात.

आजच्या माझ्या विद्यार्थी मित्रानो तुमची आजची “प्यारी” गाणी अजून ४०-५० वर्षा नंतर तुम्ही कदाचित ह्याच तल्लीनतेने ऐकत असाल…

मधुसूदन थत्ते
१३-०२-२०१६

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *