माकडाचे intelligence

डार्विनच म्हणाला ना…माकडापासून माणूस उत्क्रांत झाला…की आणखी कोणी हे म्हणले ?

कोणी का असेना…आज “NAT GEO WILD” ह्या channel वर जे दाखवले ते पाहून माकडाला मात्र शाबासकी द्यावीशी वाटली.

हे माकड कवठा सारखे एक फळ घेते. आतला गर त्याला हवा असतो. मग ते फळ ते एका मोठ्या दगडावर आपट आपट आपटते ..ते फुटते आणि गर मिळतो..

हे एक चित्ता बघत असतो…तो घेतो माकडावर झेप पण माकड निसटते आणि दगड खडक असे चढत एका उंचीवर जाऊन खाली बघते.

चित्त्याला पण चढून जायचे असते..तो पुढे पाऊल टाकणार इतक्यात वरून एक भला मोठा दगड ते माकड चित्त्यावर फेकते..चित्ता ते चुकवतो पण मग माकड एकाहून एक लहान मोठे दगड खाली भिरकावत बसतो..

इतके की शेवटी तो चित्ता जातो पळून…!!!

बघा ह्या माकडाचे intelligence …!!!

मधुसूदन थत्ते
१८-०३-२०१६

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *