मला दिसलेले तीन तुकडे.

लाल माती…निळा सह्याद्री…अथांग सागर समोर पसरलेला…तुम्ही कोकणात नेहेमी बघत असाल हे दृश्य, मित्रांनो.

मी भटकंतीत होतो…एकटाच..

एकटेपण मनासाठी मला हवं हवंसं असतं…नेहेमीच..

डोंगर उतारावर होतो…जवळच खाली कोकणातले सुजलाम सुफलाम गाव होतं.

समोर खालपर्यंत पसरलेलीझाडी होती…..इतक्यात माझे लक्ष एका झाडांमुळे झालेल्या पोकळीकडे गेले…

पहातो तो काय..त्या पोकळीतून मला समुद्राच्या लाटा दिसल्या…दूर लांब असणार त्या…!! विशाल सागर होताच ना तिथे.खाली….!!

मी मिनिटभर त्या समुद्राच्या तुकड्याकडे टक लावून पहात होतो.!!!!!!!!
◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘

अजून संध्याकाळ व्हायची होती…समोर एक वाडी दिसली…आत एक कौलारू घर दिसले..म्हटले बघू आत प्यायला गार पाणी मिळेल का ते..

घर तर साधे, सुंदर होते..स्वच्छ, नेटके आणि एक मनस्पर्शी असे पावित्र्य तिथे मला जाणवले….

आत कोणी नव्हते….

वाडीकडे मी कटाक्ष टाकला…राखली-जोखली अशी नेटकी सुंदर वाडी पाहून मला वाटले इथेच का न बसा एका वृक्षाखाली…..

खरेच किती सुंदर वनश्री आहे इथे…आणि वर ते नितळ निळे निळे आकाश…

घरात शिरलो तो वरची दोन कौले जाऊन तिथे झरोका झालेला दिसला…आणि त्यातून मला आकाश पण .दिसले ..

नितळ निळे निळे आकाश…नव्हे, आकाशाचा तुकडा..

मी मिनिटभर झरोक्यातून दिसणा-या त्या आकाशाच्या तुकड्याकडे टक लावून पहात होतो.!!!!!!!!!
◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘

इतक्यात कानी स्तोत्र आले..

ओम शान्तांजपा कुसुम वर्ण विभूषितांगिम
नाना विचित्र मणिरंजित हेमभूषाम …

आवाजात काय भारदस्तपणा होता…!!

कोण बरे आले..म्हणून मी दाराकडे वळलो…

एक शुचिर्भूत तेजस्वी असे कोकणातील ब्राह्मण असावे ते ..चेहेराच बोलला हे पावित्र्य काही वेगळे आहे..

“जरा प्यायला पाणी हवं होतं..”…मी

“हो हो, देवा…बसावं..आणतो पाणी…” ते उद्गारले..

क्षणभर आमची द्रुश्टभेट झाली…ते आत गेले..

मी विचार करू लागलो..परमात्मा-स्वरूप आणखी काय वेगळे..

मी मिनिटभर मनात उमटलेल्या त्या परमात्याच्या तुकड्याकडे टक लावून पहात होतो.!!!!!!!!!
◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘

मधुसूदन थत्ते
१०-०६-२०१६

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *