पणतीचा संदेश

श्री. य. गो. जोशी सुंदर कविकल्पना गोड आणि सोप्या शब्दात मांडत असत.

एका सकाळी दूरवर वृक्षाच्या पारावर एक मारुती मंदिर ते पहातात…दूरवरूनही तिथली पणतीची तेवती ज्योत त्यांना दिसते..तिच्यावर दृष्टी खिळवून ते इतके तल्लीन होतात की क्षणभर “त्या ज्योतीच्या रूपाने मीच तर नाही प्रकाशत असे त्यांना वाटून जाते..

इतक्यात वा-याची झुळूक येते आणि ज्योत थरथरते..Preview

“आपण आणि ज्योत भिन्न आहोत हे मला कळले” ते म्हणतात..

दिवस हळू हळू प्रकाशमान होऊ लागतो आणि ज्योत हळु हळू क्षीण होत जाते…

ते म्हणतात..

“जणू जमिनीत बीज अदृश्य व्हावे आणि त्याचा थोरला मोठा वृक्ष व्हावा तद्वत ज्योत मावळत गेली.. रवी वर येऊ लागला आणि ..दिशांच्या रूपाने एक प्रकाशाचा महान वृक्ष त्या लहानग्या ज्योतीतून निर्माण होत गेला…

आणि

त्या प्रकाश वृक्षाला एक अलौकिक आणि विलोभनीय फळ धरले आणि ते फळ आकाशात सूर्यबिंबाच्या रूपाने वर वर येऊ लागले…”….!!!!

================================

शब्द: मधुसूदन थत्ते

मूळ लेखन आणि फोटो “सुबोध ज्ञानेश्वरी: य. गो. जोशी…पृष्ठ २०७-२०८

०८-०५-२०१६

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *