धृति…..धैर्य…

कुणाचे धैर्य..? कशासाठी धैर्य..?

कोणी ह्या अद्भुत धृतीची कल्पना मांडली…(व्याख्या केली असे म्हणूया हवे तर)..?

प्रत्यक्ष ज्ञानदेवांनी…ज्ञानेश्वरी अध्याय १३, ओव्या १४२ ते १४७..ह्यात..!!!

ज्ञानदेव म्हणतात..

पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूते विचारात घ्या..ह्या पाच तत्वांचे परस्परात वैर आहे…

जलाने पृथ्वीचा नाश…

तेज जळाला आटवते..

वायू नित्य तेजाशी झटापट करत रहातो..

आकाश तर वायूलाच गिळायला बघते ..

आणि..

आकाश हे कोणाशीही मिसळत नाही…पण प्रत्येकात शिरून ते स्वत: स्वतंत्र असते.

अशी ही पाच महाभूते आपापले वैर विसरून मानवी देहात एकत्र येतात आणि आपापल्या गुणांनी परस्परांचे पोषण करतात…

अशी सहसा न घडणारी त्यांची जूट ज्याच्या योगाने घडून येते व धैर्याने टिकते त्या धैर्यालाच धृति म्हणतात.

मनुष्य देहाला ह्या १३व्या अध्यायात “क्षेत्र” म्हटले आहे आणि ते एकूण ३६ तत्वांचे बनले असते त्यातली ही पंचतत्वे (पंचमहाभूते) झाली..

आता उरलेली तत्वे काय आणि कशी आहेत हे, मित्रांनो, तुम्ही वाचून पहा…
मला जमले तर मी इथे ते देण्याचा प्रयत्न करीनच.

शब्दांकन : मधुसूदन थत्ते
०३-०४-२०१६
संदर्भ : सार्थ श्री ज्ञानेश्वरी :बाळकृष्ण अनंत भिडे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *