ओहोरे ताल मिले नदीके जलमे…

ओहोरे ताल मिले नदीके जलमे…

ओहोरे ताल मिले नदीके जलमे…

आज अचानक हेच गीत ऐकावेसे वाटले….लावले…त्या philosophy त मी पार रंगून गेलोच पण ब-याच नंतर घरातल्या दोघा तिघांच्या ओठी तेच गाणे आलेले ऐकून वाटले एखादे गीत…त्याचे शब्द…संगीत…अभिनय…छायाचित्रण हे असे काही जादूचे मिश्रण बनते की आपण ते विसरू शकत नाही. नाहीतर का हे १९६८ चे गाणे ऐकावे असे मला वाटून गेले..??

खरेच, जीवनातले काही प्रश्न “कोई जाने ना…” असेच उरतात नाही का…?

ह्या गाण्याला मुकेश व्यतिरिक्त अन्य गायक न्याय देऊ शकला नसता…

आणि….

संजीव कुमार व्यतिरिक्त भोळा-भाबडा नायक कुठून मिळाला असता…??

आणखी एक…

black and white इतके सुंदर रंगीत चित्रिकरण झाले असते का…?

मधुसूदन थत्ते
०४-०३-२०१६

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *