ए नदी चलती कहां

कोणी कवी सहजी विचारतो….”ए नदी चलती कहां, प्यार बटोरती यहां वहां…..”

प्यार आणि पावित्र्य…

मार्गातल्या मनुष्य वस्त्या स्वच्छ करत जाता जाता मनुष्य मनेही स्वच्छ करणारी नदी ही देवाची देणगीच, नाही का?

ऋषीकेशच्या कोण्या निर्मनुष्य अरण्यातून वाहाणारी गंगा…मनुजाने देवी मानली.

हंडिया-नेमावरच्या दाट तरीही प्रसन्न अशा जंगलातून जाणारी ओघवती पश्चिम वाहिनी नर्मदा…मनुजाने देवी मानली.

कर्नाटकच्या पश्चिम घाटात उगम घेतलेली पूर्व वाहिनी कावेरी…मनुजाने देवी मानली.

वाईला समृद्ध भूमी आणि समृद्ध विचारवंतांची मने बहाल करणारी कृष्णा…मनुजाने देवी मानली.

किती उदाहरणे द्यावीत….!!!!

ह्या क्षणाला ह्या जागेवरून वाहून गेलेले पाणी गेले…गेले…कायमचे गेले….पुन:श्च मागे वळून पहाणे नाही…

नेमके हेच आपण अनुसरायला विसरतो…

आला क्षण गेला…मिळालेले सुख-दु:ख क्षणिक..आले अन गेले…कायमचे गेले….विसरायला हवे…उगाळत बसणे नको…पुन:श्च मागे वळून पहाणे नको……

निसर्ग खूप शिकवतो…मूकपणे…नाही का??

मधुसूदन थत्ते
२६-०९-२०१५

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *