आणि माझी आई रडली…

मी शाळेतून घरी येत होतो..आता घरी मी निवांत असं एकटा असेन..बहिण बाहेर गेली असेल आणि बाबा कामावर…आई तर तिच्या नुकत्याच लागलेल्या नोकरीवरून यायला दीड तास आहे…देईन मस्त ताणून..

घरात शिरलो…दिवा लावला आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला…!!!

हातानी तोंड झाकून आई कोचाच्या टोकाला बसली होती…रडत होती…तिला आजवर मी कधीच रडताना पाहिले नव्हते…!!!

मी तिच्या जवळ गेलो..

“आई…काय ग झालं?

आईने एक मोठा श्वास घेतला..म्हणाली..

“काही नाही रे महत्वाचं एवढं..मला नोकरीवरून काढलं…फार हळू हली टाईप करते म्हणून… ”

“अगं पण तुला जेम तें तीन दिवस झाले ही नोकरी लागून…करशील तू टाईप वेगाने…त्यात काय…”  … जेव्हा जेव्हा मला काही महत्वाचे यायचे नाही तेव्हा अशीच ती मला सांगायची.

“नाही रे…त्यांच्या जवळ मला द्यायला तेवढा वेळ नाही अजिबात”  आई..

“काहीतरीच काय..लागल्या लागल्या तुला खूप काम देणे हे बरोबर नाही…” मी अन्याय झाला असे दाखवले पण आई खूप प्रामाणिक होती..तिने स्वत: तो दोष पत्करला…म्हणाली..

“मला नेहेमी वाटायचं मी काहीही प्रयत्नांती करू शकेन..पण नाही रे..हे मला नाही जमलं..”

माझा तेव्हाच वय सोळा…आपली आई काहीही करू शकेल असाच होता तेव्हा माझा दृढ विश्वास…

आम्ही खेड्यातून शहरात आलो ते आईच्या हिमतीवर…बाबांना तिचे केवढे मोठे पाठबळ होते..

शहरात आल्यावर तिने ठरवलं नर्सरी शाळा काढायची…!!!  आई त्यातला अजिबात काही जाणत नव्हती..शिकली नव्हती…पण सहा महिन्याचा एक पोस्टल कोर्स तिने केला, डिप्लोमा मिळवला आणि केली सुरु शाळा…

काही महिन्यातच आईच्या शाळेत मुले घालायला पालक अधीर असायचे…मुलंही शाळा सुटल्यावर घरी जायला नाराज असायची.

आई ही अशीच असते हाच मुळी माझा कायम झालेला समज होता… ..

पण ती नर्सरी काय किंवा नंतर आईने चालवलेली खानावळ काय..मी आणि माझ्या बहिणीच्या कॉलेज शिक्षणाचा खर्च पुरवू शकणार नव्हती…बाबा थकले होते आणि त्यांच्याकडून अधिक काही कामाची अपेक्षा नव्हतीच..कसा पैसा उभा करावा ह्या विवंचनेत आई असायची..

आता मागे वळून पहाताना मला तेव्हा काय काय हवं असायचं हे आठवते..बरोबरीच्या मुलांचे काय काय लाड व्हायचे ते मला दिसायचं .माझ्यासाठी आई-बाबा खरच किती कमी करतात असे वाटायचे..पण मला एकदाही हे वाटले नाही की त्या दोघांच्याही काही गरजा असाव्या, काही कठीण प्रश्न त्यांच्या समोर असावेत…छे..त्याचा मी कधी विचारच केला नव्हता..

खानावळ बंद केल्यावर आई एक जुन्या बाजारातून टाइप रायटर घेऊन आली..जुनाच तो..कधी कधी टाइप व्हायचं नाही.. एक अक्षर दाबले की दुसरेच उमटायचे..

त्या दिवसापासून, कान आटोपले की आई दार बंद करून टक टप, टक टप तासन्तास टाइप करत बसायची सरावासाठी…मध्यरात्रीपर्यंत सुद्धा..

मग त्या ख्रिसमसला तिने बाबांना आनंदाची बातमी दिली…तिला नोकरी मिळाली..अर्थात तिला आपल्या टाइपिङ्ग क्षमतेची शंका मात्र होतीच..

तिला एवढा आनंद झाला होता पण मला त्याचं काही विशेष वाटलं नव्हतं..

कामाचा पहिला दिवस सन्मून आई घरी आली..मनाने खूप थकल्यासारखी वाटली…दुस-या दिवशीही तीच तऱ्हा…दुस-या दिवशी तर घरकाम सारं बाबांनीच उरकलं होतं…

मी बाबांना विचारलं…    आई  ठीक आहे ना? काही होतय का तिला?”

“नाही तसा विशेष काही..फक्त तिला तिथलं टायपिंग जड जातय..”  बाबा

ते पुढे म्हणाले..”बघ तुम्हा मुलांच्या शिक्षणासाठी आई केवढे परिश्रम करते आहे…”

मला त्याचे काहीच विशेष वाटले नाही..मी निघून गेलो मित्राकडे खेळायला…

मी परतलो तेव्हा घरात अंधारच होता..आईच्या खोलीच्या बंद दाराखालच्या प्रकाशाच्या पट्टीने सांगितले की आई आत काहीतरी करते आहे..

मी आत गेलो आणि मला धक्काच बसला..आईच्या डोळ्यात अश्रू होते…आजवर मला हे कळलेच नव्हते का की तिच्या मनावर प्रचंड ओझे असावे आमच्या शिक्षणाचे…??

मी तिच्या जवळ गेलो…आई म्हणाली

“मला पटलं आहे की आपल्या सर्वांनाच केव्हा ना केव्हा अपयश पदरात घ्यावं लागतं. ”

अजाणतेपणी मी आईच्या गळ्याभोवती माझे हात टाकले आणि तिला जवळ ओढले…आई एकदम लहान मुलासारखी ओक्साबोक्शी रडू लागली. मी काहीच बोललो नाही. तिला मोकळे होऊ दिले. तिच्या वाकलेल्या पाठीवर हात फिरवतांना मला प्रथमच तिची असहाय्यता जाणवली. मनात आले, अरे ही तर आपली आई…जिला अपयश आजवर आलेच नाही…

हो, पण आज कळले की ती पण माझ्यासारखीच काही गोष्टींना भिते, धजत नाही करायला…अपयश येईल असाही विचार करते तर..

मी अशा स्थितीत असताना हजार वेळा तिने मला कुशीत घेऊन आधार दिला आहे आजवर…!!!

आई लगेच सावरली…म्हणाली ठीक आहे..मला ओझे होऊन तिथे नोकरी करायची नाही….

आईला निम्म्या पगारात दुसरीकडे नोकरी मिळाली. पण तिचे त्य्पिंग तिने चालूच ठवले होते.

दोन वर्षे गेली…मी कॉलेज साठी आता घराबाहेर पडणार होतो..आईला आता दुसरी चांगली नोकरी मिळाली होती..

आई आपल्या पराजयातून बरेच काही शिकली हे मात्र नक्की..

शिक्षण संपवून मी एका वृत्त पत्रात वार्ताहर म्हणून लागलो होतो…तिथेच आई रिपोर्टर म्हनून काम करत होती…!!!

तिच्या त्या दिवशीच्या ओक्साबोक्शी रडण्याबद्दल मात्र आम्ही पुन: कधीच बोललो नाही. पण हे तितकेच खरे की मोठा झाल्यावरही जेव्हा जेव्हा मला निराशा घेरायाची तेव्हा तेव्हा मी ते रडणे आठवून आईच्या त्या असहाय्यतेतूनच तिने कशी मानसिक ताकद मिळवली हे मनात आणून दुप्पट जोमाने अडचणींवर मात करत होतो.

पुढे काही वर्षांनी आईच्या वयाच्या पासस्टाव्या वर्षी मी आई-बाबांना घरी बोलावले…स्वत: घरातले सगळे काम केले…जेवण उरकल्यावर स्वैपाक घर साफ करत असता आई तिथे आली…कौतक नसते ओसंडून वहात होते तिच्या डोळ्यातून..

मी म्हटले…”आई..त्या टाइप रायटर चं काय झालं गं पुढे?”

“अरे आहे तो…मी खूप जपलाय त्याला…”  आई आणि पुढे म्हणाली

“ज्याने तुला पटवून दिले की आपली आईही अखेर माणूसच  आहे, तिलाही अपयश सोसावे लागते..त्या  वस्तूला मी जपणार नाही का?

मला आश्चर्याचा पुन: धक्का बसला…म्हणजे जे मला त्या वयात कळून चुकले होते ते तेव्हाच आईने जाणले होते तर…!!!!

“आई…तो टाइप रायटर मला देशील?”  मी

“हो…पण एका अटीवर…तो तू तसाच ठेवायचास..रिपेअर करायचा नाहीस…”  आई

आणखी एक…आई पुढे म्हणाली…लहान असो मोठा असो जेव्हा तुझ्या मनात येईल ह्याला जवळ घ्यावे, हाताच्या स्पर्शाने रोमांचित करावे तेव्हा ते तात्काळ करत जा…त्याची जादू ही कायम असते बघ…”

मी लग्गेच आईला जवळ घेतले…”वाढ दिवसाच्या, आई, तुला अगणित शुभ्र्च्छा…”

खूप काळ मागे लोटला आहे…तो टाइप रायटर मानाची जागा पटकावून आहे माझ्या मोठ्या ओफ्फिचे मध्ये…

ते तर माझे स्मृती चिन्ह आहे..

जेव्हा जेव्हा मला लेखनात काही सुचेनासे होते तेव्हा मी तो उघडतो, त्यावर एक कागद टाकतो आणि बस..जमेल तसे टाइप करत जातो…

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *